नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
योजनेचे स्वरूप -
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे. या योजनेद्वारे पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी राज्य सरकारकडून अतिरिक्त ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी दोन्ही योजना (नमो शेतकरी व PM-Kisan) मिळून एकूण १२,००० रुपयांचा लाभ होतो. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची रक्कम प्रत्येकी २,००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये -
वार्षिक मदत: दरवर्षी ६,००० रुपये (प्रत्येकी २,००० रुपयांचे ३ हप्ते) दिले जातात.
एकूण लाभ: पीएम-किसान योजनेच्या ६,००० रुपयांसह एकूण १२,००० रुपयांचा लाभ मिळतो.
लाभ वितरण पद्धत: डीबीटी (DBT) द्वारे थेट बँक खात्यात पैसे जमा होतात.
योजनेसाठी पात्रता: पीएम-किसान योजनेसाठी पात्र असणारे शेतकरीच या योजनेसाठी पात्र आहेत.
लाभार्थी यादीत नाव शोधणे व खात्यात हप्ता जमा झाला का हे पाहण्यासाठी MahaDBT 👈या लिंक वर क्लिक करा.
नमो शेतकरी योजना लाभार्थी यादीत नाव पहा 👉 शोधा
नमो शेतकरी योजनेचा बँक खात्यात हप्ता जमा झाला का? 👉 पहा
PM Kisan सन्मान निधी योजना लाभार्थी यादी
0 टिप्पण्या