SBI (स्टेट बँक ऑफ इंडिया) मध्ये 9124 जागांची पदभरती - ऑगस्ट 2026
(जाहिरात क्र. CRPD/CR/2026-27/17)
ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि शुल्क भरण्याचा कालावधी : 11.08.2026 ते 31.08.2026
SBI ज्युनिअर असोसिएट भरती 2026
State Bank of India कडून लिपिक संवर्गातील Junior Associate (Customer Support & Sales) पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमध्ये उमेदवाराला केवळ एका राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील उपलब्ध जागांसाठी अर्ज करता येईल. तसेच संपूर्ण भरती प्रक्रियेत उमेदवाराला परीक्षा एकदाच देता येणार आहे.
स्थानिक भाषेची अट
ज्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी उमेदवार अर्ज करेल, त्या ठिकाणची अधिसूचित स्थानिक भाषा उमेदवाराला वाचता, लिहिता, बोलता आणि समजता येणे आवश्यक आहे. ही भाषा उमेदवाराला येते की नाही, याची स्वतंत्र चाचणी ऑनलाइन मुख्य परीक्षेनंतर आणि नियुक्तीपूर्वी घेतली जाईल. या चाचणीत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनाच पुढील नियुक्तीसाठी पात्र मानले जाईल. मात्र, उमेदवाराने इयत्ता १०वी किंवा १२वीमध्ये संबंधित स्थानिक भाषेचा अभ्यास केला असल्याचे गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्राद्वारे सिद्ध केले, तर स्वतंत्र भाषा चाचणी देण्याची आवश्यकता राहणार नाही.
बदलीबाबत महत्त्वाची अट
Junior Associate म्हणून बँकेत रुजू झाल्यानंतर पहिली ५ वर्षे पूर्ण होईपर्यंत आंतरवर्तुळीय किंवा आंतरराज्यीय बदलीची सामान्यतः तरतूद नाही. ५ वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतरही बदली हा हक्क मानला जाणार नाही. मात्र अत्यंत विशेष परिस्थितीत, उदाहरणार्थ अतिशय गंभीर कौटुंबिक परिस्थिती किंवा पती-पत्नीच्या एकत्रित नियुक्तीशी संबंधित बाब, बँक आपल्या लागू बदली धोरणानुसार विनंतीचा विचार करू शकते.
परीक्षा कधी होणार?
उपलब्ध माहितीनुसार परीक्षेचे वेळापत्रक सध्या तात्पुरते आहे.
प्राथमिक परीक्षा: सप्टेंबर २०२६
मुख्य परीक्षा: नोव्हेंबर २०२६
परीक्षेच्या तारखा, रिक्त पदांची संख्या, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि इतर महत्त्वाच्या सूचनांमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी SBI Careers – Current Openings हे अधिकृत संकेतस्थळ नियमितपणे तपासावे.
👉 जाहिरात

0 टिप्पण्या